आज दि. ०१-०६-२०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी स्व. शिवराम भाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मनीष दळवी साहेब यांनी स्व. शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बँकेचे संचालक श्री. विद्याप्रसाद बांदेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. दिवाकर देसाई, सहकार मंडळातील मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
