दि. ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम आयोजित करण्यात आला

“आईच्या नावाने एक झाड, पर्यावरणासाठी मोठे योगदान!”

यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब,सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, सावंतवाडी मंडल युवा अध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्रप्रमुख गोविंद साटेलकर, सुदेश नेवगी, पंकज तळसुलकर, अभिजीत धुरी, विनेश तावडे, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई श्रीकांत राज्याध्यक्ष आदी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!