येत्या 14 जून रोजी स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले ‘ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अवघ्या 5 महिन्यातच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे पाहून अनेकांनी मालिका सुरु ठेवा अशी विनंती केली होती. प्रेक्षकांच्या या विनंतीचा विचार करून डॉ अमोल कोल्हे यांनी ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या 13 जुनपासून मालिकेच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात होणार असे आश्वासन त्यांनी कलाकारांना दिले आहे. स्टार प्रवाह वरील या मालिकेचा प्रवास संपला आहे पण त्यानंतर मालिकेचा पुढचा प्रवास कुठल्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे. तूर्तास मालिका चालू राहणार म्हणून प्रेक्षकांनीही स्वागत केलेलं बघायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!