संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यातील कुंभार समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सिद्धिविनायक सभागृह माजगाव भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, प्रा. नारायण परब यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे.या सत्कार सोहळ्याला कुंभार समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे. विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर रोजगाराचे धडे देखील शिकले पाहिजेत. यासाठी जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारिणी विशेष मेहनत घेत आहे.

तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी, समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग आणि सर्व तालुका अध्यक्ष यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!