राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मते, ही योजना कर्जमाफी नसून कर्जवसुलीचा मार्ग ठरत असून त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,रुपेश जाधव राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस, उत्तम सराफदार सहकार सेल जिल्हाध्यक्ष, नजीर शेख अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष, सचिन पाटकर सोशल मीडिया अध्यक्ष कोकण विभाग,अक्षय मराठे वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष, सुंदर पारकर जिल्हा कार्यकारणी सदस्य, अविनाश राणे तसेच सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
