निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक जास्वंदीचे फूल उमलले आहे. या एकाच फुलामध्ये लाल आणि पांढऱ्या अशा दोन्ही रंगांची आकर्षक उधळण पाहायला मिळत आहे.

सामान्यतः जास्वंदीचे फूल हे पूर्ण लाल, पांढरे किंवा पिवळे असते. मात्र, मुरकर यांच्या बागेतील या फुलामध्ये निसर्गाने रंगांची अशी काही जादू केली आहे की, अर्धे फूल गडद लाल आणि अर्धे फूल पांढऱ्या रंगात न्हाऊन निघाले आहे. एका चित्रकाराच्याच परसबागेत निसर्गाने रंगांचा हा अनोखा चमत्कार दाखविल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे.

हे वैशिष्ट्यपूर्ण फूल पाहण्यासाठी आणि निसर्गाच्या या रंगीत किमयेचा आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी सध्या मदन मुरकर यांच्या घरी निसर्गप्रेमीं येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!