शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा २०२६, उद्या आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते दिवप्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डब्लू. सी. ठाकूर सर करणार आहेत.या नंतर प्रास्ताविक व स्वागत प्रभारी उप प्राचार्य प्रा. एस. आय. कांबळे हे करतील. यानंतर अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. उपस्थित पालकांमधून काही पालक मनोगत व्यक्त करतील.
प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत हे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतील. यानंतर आभार प्रा. पी. एन. वाडकर करतील. हा कार्यक्रम कॉलेजच्या नवरंग कलामंच येथे होणार आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना केले आहे.
