पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला गेला. यावेळी अनेक ठिकाणी वृक्षारोपण आणि विविध सामाजिक वस्तू प्रदान करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
युवा नेते जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी शैक्षणिक भान जपत ओटवणे येथील ४ शाळांच्या ४ थी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कंपास पेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, विश्वनाथ बोर्ये, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर आदि मान्यवर उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक वर्गाकडून पालकमंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देताना युवा नेते विक्रांत सावंत यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.
युवा नेते जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत आणि मित्रमंडळ यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले..
