filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 128;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 35;

पावसामुळे सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये प्लास्टिक बॉटल यांचा मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला हानी पोचत होती. त्यात करून काही हॉटेल व्यावसायिक हे सुद्धा काही प्रमाणात कचरा मोती तलावामध्ये टाकत असल्याचे निदर्शनास आले.

याची दखल घेत बजरंग दल आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, कचरा जमा करण्यात आला. यावेळी बजरंग दलाचे युवा कार्यकर्ते आणि नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी प्लास्टिक मोती तलावामध्ये न टाकण्याचे आवाहन यावेळी नगरपालिका अधिकारी आणि बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले. शिवाय एखादा व्यक्ती मोती तलावामध्ये कचरा अथवा प्लास्टिक टाकताना आढळून आल्यास त्याला त्याच ठिकाणी दंड ठोठावणार असल्याचे नगरपालिका अधिकारी यांनी सांगितले. शिवाय नागरिकांना स्वच्छता पाळण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!