सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला महत्त्वाचा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. देवगड म्हणजे हापूस आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय, स्वच्छ समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य यांची ओळख असलेला प्रदेश. अशा भागात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सरकार चा पुन्हा एकदा हट्ट समोर आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्न आणि चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सिंधुदुर्गातील देवगड परिसराचा विचार का केला जात आहे? पर्यटन, शेती आणि मत्स्यव्यवसायावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या कोकणावरच असे मोठे औद्योगिक प्रकल्प वारंवार का सुचवले जातात, हा प्रश्न अनेक स्थानिकांकडून आणी आमच्याकडून म्हणजेच काँग्रेस कडून उपस्थित करत आहोत.
अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थक ऊर्जा सुरक्षा, वीज निर्मिती आणि औद्योगिक विकासाची, अनेक नोकऱ्या यांची बाजू मांडतात. त्यांना सांगावं स वाटतं कीं काँग्रेस आणी सर्व शेतकरी बांधव, मत्सव्यावसायिक मते अशा प्रकल्पांमुळे पर्यावरण, समुद्री जैवविविधता, मत्स्यव्यवसाय, शेती आणि पर्यटनावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. या प्रकल्पा च्या परिणामांबाबत आणि त्यांचे मूल्यांकन वैज्ञानिक अभ्यास, पर्यावरणीय परिणाम अहवाल (EIA) आणि स्थानिकांच्या अनुभवांच्या आधारे करणे आवश्यक आहे.
स्थानिक नागरिक आणी काँग्रेस म्हणून आमचा मुख्य प्रश्न असा आहे की, जर सिंधुदुर्गची ओळख पर्यटन, हापूस आंबा, काजू आणि मत्स्यव्यवसाय अशी आहे, तर या नैसर्गिक संपत्तीचे जतन करत विकासाचा पर्याय शोधला जाऊ नये का?अणु ऊर्जा प्रकल्पमुळे जगातीला एक नंबर चा
देवगड हापूस च नाव ऐतिहासिक जमा करायचा आहे का?
कोणताही मोठा प्रकल्प राबवण्यापूर्वी स्थानिकांची संमती, पारदर्शक माहिती, पर्यावरणीय परिणामांचे निष्पक्ष मूल्यांकन आणि जनतेच्या हिताचे संरक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. आमच्या जिल्याचे पालकमंत्री यांनी मीडिया ला दिलेल्या माहिती नुसार असा कोणताही प्रकल्प होणार नाही तर यासाठी त्यांनी एक जनता दरबार भरवावा आणी जाहीर कराव असा कोणताही प्रकल्प होणार नाही
येत्या 3 जुलै ला होणाऱ्या मिठमुंबरी येथील जलसंमाधी आंदोलनास सर्व विरोधी पक्ष सह सिंधुदुर्ग महिला काँग्रेस सुद्धा अग्रेसर आहे. काँग्रेस चे युवक अध्यक्ष शेतकरी बांधव किरण टेम्बुळकर त्यांच्या कार्यकर्त्या सह सुद्धा सामील असतील तसेच महिला तालुका अध्यक्ष, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ साक्षी वंजारी महिला काँग्रेस सुद्धा या आंदोलनास उपस्थित राहणार आहे.या आंदोलनामध्ये कृषी सेवा केंद्र, मच्छि विक्रेते यांनी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..
