सावंतवाडी नगरपालिका ते आमदार हा प्रवास एवढा सोपा नव्हता. ह्या प्रवासात होती अनेक आव्हाने, लोकांच्या अपेक्षा. कारण या विधानसभा मतदार संघाला एक सांस्कृतिक वारसा होता. हा वारसा पुढे नेणे आणि तो टिकवून ठेवणे हे नेहमीच आव्हानात्मक होते. मात्र हे लिलया शिवधनुष्य पेलले ते आमदार दीपक केसरकर यांनी..

इतरांसाठी आमदार असलेले दीपक केसरकर सर्वसामाय जनतेसाठी अजूनही भाईच आहेत. कोणतीही समस्या, कोणतेही काम असलं तरी थेट भेट देऊन ती जाणून घेणारा हा सर्वसामान्य लोकांचा हा नेता आजही लोकांच्या मनात तेवढाच घर करून आहे. सत्तेची मस्ती डोकयात गेली की अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये आपल्या कानावर येत असतात मात्र या बाबतीत दीपकभाई केसरकर यांचं नाव मात्र आदराने घेतलं जात.

आज जिल्ह्यात मच्छीमार असतील, शेतकरी असतील, बचत गटातील महिला असतील, युवा असतील यांना रोजगारच द्वार खोलून देण्यात नक्कीच दिपकभाई यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या चांदा ते बांदा या बहूउपयोगी योजनेद्वारे संपूर्ण राज्यात रोजगाराचे जाळे तयार केले.याद्वारे जेव्हा वादळामुळे मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले होते त्यावेळी या योजनेद्वारे त्यांचा संसार पुन्हा एकदा उभा करून दिला.

अहिंसाच्या मार्गाने राजकारण आणि समाजकारण करणे सोपे नसताना देखील त्यांनी ते करून दाखविले. शिवसेना पक्षात ज्यावेळी फूट पडली त्यावेळी त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ पकडली. यावर दीपक भाई यांच्या मतदारसंघात कोणतेही अनुचित प्रकार घडले नाहीत. यावर इथल्या जनतेचा आपल्या नेत्यावर असलेला विश्वास नक्कीच दिसून आला. आज कोट्यावधी रुपयांची विकास कामे त्यांनी आपल्या मतदारसंघात केली आहेत, चालू आहेत आणि यापुढे देखील चालू राहतील.लोकांच्या विकासापेक्षा कोणतेही अजून महत्वाचे काम नाही असा त्यांचा आजही मानस आहे.

राजकारण आणि भ्रष्टाचार अश्या एकाच नाण्याच्या दोन बाजू अलीकडे पाहायला मिळत आहेत. मात्र दीपकभाई याला अपवाद ठरले आहेत. जन्म एका सधन घरात झाला असला तरी त्यांनी आयुष्यभर जनतेच्या सेवेचे व्रत घेतले असल्याने ते नेहमीच जनतेचा सुखाचा विचार करताना पाहायला मिळत आहेत. केवळ शासकीय मदत मिळेल या आशेवर न राहता प्रसंगी पदरचे पैसे खर्च करत त्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांना मदत केली आहे. आताच्या स्वार्थी राजकारणात निःस्वार्थ पणे सेवा देणे हे नक्कीच दीपक केसरकरच करू शकतात.

अश्या या अहिंसेचा महामेरू असलेल्या आणि दुःखी, कष्टी, जणांचा आधारू असलेल्या दीपकभाई केसरकर यांना समस्त जिल्हावासियांच्या वतीने शुभेच्छा देताना नक्कीच म्हणावंस वाटतय..

झाले बहू, आहेतही बहू, होतीलही बहू, परी यासम हा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!