लोकप्रिय आमदार दीपकभाई केसरकर यांचा वाढदिवस हा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. हे सर्व उपक्रम जनतेच्या हिताच्या दृष्टीने असणार आहेत. यात प्रामुख्याने रुग्णांना फळ वाटप, गरजू व्यक्तींना छत्री वाटप, असे वाटप करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे २० जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत के. एल. ई. विद्यापीठ, के. एल. ई. संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेलगावी, दिपकभाई मित्र मंडळ, सावंतवाडी तालुका शिवसेना आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, पचन संस्था / पोटाचे रोग, फिजिओथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती, नेत्ररोग, ई. सी. जी., मेंदू व मज्जासंस्था शश्त्रक्रिया, छाती व श्वसन रोग, कान. नाक व घसा, कर्करोग तपासणी, बालरोग, त्वचारोग, टुडी ईको, मधुमेह व संप्रेरक ( हार्मोन्स) विकार, जठारांत्र ( पचनसंस्था ) रोग, दंत व मुख- जबडा शस्त्रक्रिया, मूत्ररोग व मूत्रपिंड रोग, अस्थीरोग व सांधे प्रत्यरोपण, अवयव प्रत्यारोपण मार्गदर्शन, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आदि आजारावर तपासणी होणार आहे. या महाशिबिराची जबाबदारी नगरसेवक देवा सूर्याजी यांच्यावर असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी दिली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख व नगरसेवक ॲड नीता सावंत कविटकर, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर,नगरसेवक देव्या सूर्याजी, ॲड सायली दुभाषी,स्नेहा नाईक,शहरप्रमुख भारती मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते..
