कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक, सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा द्वितीय पुत्र समर्थ गावडे वय (१६) याचे बुधवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी, काका, काकी असा मोठा परिवार आहे.
समर्थ हा गेली १५ वर्षे मेंदू विकाराने पीडित होता. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेवून उपचारही करण्यात आले होते. जन्मदिनाच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या छोट्या मेंदूला इजा पोचल्याने तो अंथरुणात होता. अखेर बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. बुधवारी रात्री उशिरा उपरल स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..
