दिनांक २२ जुलै २०२६ रोजी कुडाळ पंचायत समिती येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती च्या वृद्ध कलाकारांचा राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजनेसाठी कलावंताचा मेळावा उत्साहात संपन्न झाला .
या मेळाव्या साठी कुडाळ पंचायत समिती सभापती श्री मिलिंद नाईक कुडाळ गटविकास अधिकारी श्री मनोज भोगटे यसार सोशल फाउंडेशन चे संस्थापक श्री सत्यवान तेंडोलकर , संविधानिक हितकारणी महासंघ अध्यक्ष श्री महेश परुळेकर , माजी सभापती श्री अंकुश जाधव , माजी नगरसेवक श्री गौतम खुडकर , भारतीय बौद्ध महासभेचे माजी जेष्ठ कायकर्ते श्री जनीकुमार कांबळे , भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष निलेश जाधव , सगुण जाधव ( समतादूत ) कुडाळ विद्यमान नगरसेवक श्री विलास कुडाळकर , प्रकाश तांबे ( जेष्ठ दशावतार कलाकार , श्री सुधीर अणावकर ( जेष्ठ कायकर्ते ) मंगेश गावकर ( झाराप उपसंरंपच ) विनोद जाधव ( संविधानिक हितकारणी पदाधिकारी ), चंद्रकांत वालावलकर ( संविधानिक हितकारणी पदाधिकारी ) सुशिल कदम ( तरंदळे संरपंच ) केशव जाधव ( सामाजिक कार्यकर्ते ) दिपक जाधव ( इकिगाई फाउंडेशन ) रेवती वालावलकर (स्थानिक पत्रकार ) उत्कर्ष कार्यकारी मंडळ अध्यक्ष श्री उदय आडेलकर , वामन बांबार्डेकर ( यसार फाउंडेशन उपाध्यक्ष )
रमाकांत जाधव ( यसार फाउंडेशन कोषाध्यक्ष ) अमोल पावसकर , नंदिनी पिंगुळकर , साक्षी चेंदवणकर , प्राजक्ता नेमळेकर , महीमा कदम , मयुरी जाधव सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जाधव उपस्थित होते .
यावेळी काही मान्यवरांनी इतर कलांवर होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले ते पुढीलप्रमाणे :
सत्यवान तेंडोलकर यसार फाउंडेशन संस्थापक – कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना . राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजना अनुसुचित जातीच्या ढोल सनई ताशा वाजवणाऱ्या कलकारांना माहीत नसल्याने हा समुह वंचित राहत असून . त्यांना हे मानधन मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यसारची टीम मदत करण्यात पुढे येईल असे आश्वासन दिले . तसेच ढोल ताशा सनई या कलेला शासनाकडून मानसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले .
सगुण जाधव ( समता दूत ) बांबू कलेची निर्मिती या समाजाकडून झाली असून मात्र हे कलाकार शासकीय लाभा पासून वंचित राहील्या बददल खेद व्यक्त केला .
महेश परुळेकर ( संविधानिक हितकारणी महासंघ ) सर्वात प्राचीन लोक कला असुन अनेक सण उत्सव यामध्ये महत्वाचे योगदान असून . केवळ वंचित समुहातील लोक वाजवत असल्याने या कलेला मानसन्मान नाही . महासंघ या कलाकारांच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले .
यावेळी सभापती मिलिंद नाईक यांनी ढोल, ताशा, सनई ही कोकणातील समृद्ध कला असून जिल्ह्यातील जास्तीत अनुसुचित जाती च्या कलाकारांनी राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजने साठी प्रस्ताव करण्याचे आवाहन केले आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय आडेलकर यांनी केले. तर आभार – चंद्रकांत वालावलकर यांनी मानले.सर्व मान्यवर मंडळी यांनी यसार सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने घेतलेल्या मेळाव्याचे कौतुक केले . २५० च्या वर अनुसुचित जातीचे कलाकार उपस्थित होते .
