आषाढी एकादिवशी म्हणजेच समस्त वैष्णवांचा सण. आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला भेटण्याची केवढी मोठी ती आस.तिथे छोटा, मोठा, गरीब श्रीमंत, पुरुष, स्त्री हा भेद उरतच नाही.
अशीच आस घेऊन आले होते छोटे भक्त. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल प्रायमरी स्कुलचे हे छोटे वारकरी. डोळ्यात निष्पाप भाव, हाती टाळ, मुखी विठ्ठलाचे नाव. हे सर्व छोटे वारकरी विठ्ठल नामात तल्लीन झाले होते.हा सोहळा साक्षात विठ्ठल भेटीचा ठरावा. विठ्ठल भेट काय असते यातून या छोट्या वारकरी भक्तांनी अनुभवला.
यावेळी मंदिराचे कमिटी सदस्य आबा केसरकर, सचिन मळीक, हेमंत केसरकर, सुमित वाडकर कमिटीचे इतर सदस्य आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल प्रायमरी स्कुलच्या उप प्राचार्या अवंतिका नाईक, प्राची परब, निधी सावंत,महिमा चारी,दिनेश जाधव,मयुरी ठाकूर, अस्मिता परब काकी,उपस्थित होते.