आषाढी एकादशी आज सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भावक्तीभावाने साजरी केली गेली. अगदी लहान, मुलांपासून ते वयोरुद्ध व्यक्ती देखील आज मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करताना दिसत आहेत.
याच आषाढी एकादशी निमित्ताने कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये वेशभूषा स्पर्धा व अभंग गायन स्पर्धा आणि रिंगण सोहळा आयोजित केला होता .पांडुरंग ,रुक्मिणी आणि संतांच्या, वारकऱ्यांच्या भूमिकेत आलेले विद्यार्थी विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रसाद नाईक ,उपाध्यक्षा सौ .शुभदा राऊळ ,,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.लक्ष्मण पाटकर श्रीम.स्वाती माणगांवकर श्रीम.स्नेहा पवार,अंगणवाडी सेविका श्रीम.दळवी मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम . मृगाली पालव, सहकारी शिक्षिका श्रीम .सृष्टी पाटील ,श्रीम.मेघा सावंत ,श्रीम.अनिता कतगर,श्री.गोपाळ गावडे,श्रीम.तावडे,श्रीम.सावंत आणि श्रीम.शिरसाट इ.उपस्थित होते .