कोलगावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गरजू रुग्णासाठी आवश्यक बनलं आहे. तिथे अनेक आरोग्य शिबीरे, रुग्णांवर मोफत उपचार, मोफत औषध असे दिले जात आहेत.
मात्र आता अपुरा औषध साठा, अपुरा कर्मचारी वर्ग असे चित्र दिसत आहे. ज्या पदवीधारक क्षमतेचा कर्मचारी वर्ग पाहिजे त्या पद्धतीचे कर्मचाऱ्यांची वाणवा जाणवत आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होऊ शकते. गरोदर स्त्रियांची नोंदणी आणि मार्गदर्शन देखील तिथे होत असते. अश्या वेळी जर अपुरा कर्मचारी आणि औषधसाठा यामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो.
यासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख राकेश पवार यांनी जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची भेट इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. याबाबत प्रितेश राऊळ यांनी आपण स्वतः त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन मार्ग काढू असा शब्द दिल्याचे यावेळी राकेश पवार यांनी सांगितले..