आकाशातील चंद्र जणू
धरणीवर अवतरला
लोकराजा सुधीर कलिंगण
यात मला दिसला..
लोकराजा सुधीरजी कलिंगण यांनी अनेक दशावतार पात्रे अजरामर केली. त्यांची वेशभूषा, रंगभूषा म्हणजे साक्षात विधात्याला पडलेलं गोड स्वप्न जणू. त्यांनी याच रंगभूषा, वेशभूषा आणि भाषेवरील प्रभुत्वाने अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
हा फोटो पाहून असंच वाटत की या फोटोत साक्षात लोकराजा सुधीरजी कलिंगण आहेत की काय मात्र हा नक्कीच भास आहे. हा फोटो आहे दशावतार कलेतील वयाच्या पाचव्या वर्षापासुन दशावतार कलेत पदार्पण केलेल्या, ज्याने स्वतः च्या मेहनतीने रसिकांच्या मनावर गारुड घातली असा गौरव अजय शिर्के याचा..
असा हा रंगभूमीचा सेवक गेली २५ वर्षे दशावतार कलेने रंगदेवतेची सेवा करत आहे.अश्या या युवा कलाकाराने अगदी कमी कालावधीत जिल्ह्यास्तरीय आणी राज्यस्तरीय असे एकुण ९२ पुरस्कार प्राप्त केले आहेत.दशावतार कलेसाठी अनेक कथानकांचे लेखन देखील केले आहे.
महत्वाच म्हणजे या हरहुन्नरी युवा कलाकाराने आपल्या मातीची, आपल्या कलेची मान उंचावत वल्ड एक्सलेंट बुक आँफ रेकाँर्ड भारत, अमेरीका, इंग्लंड, जापान, दुबई, स्पेन या सहा देशांमधून भारताच प्रतीनीधीत्व करत जागतिक स्थरावर सन्मान मिळवला आणी दशावतार मध्ये पहील्यांदाचआँक्सफोर्ड विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी युके यांच्या माध्यमातून दशावतार मध्ये डाँकटरेट ची पदवी प्राप्त केली. अश्या या युवा कलाकाराबद्दल बोलताना एवढं म्हणावं लागत की..आकाशातील चंद्र जणू
धरणीवर अवतरला
लोकराजा सुधीर कलिंगण
यात मला दिसला…………….