पडवे माजगांव येथील शेतकरी बाळकृष्ण आपा देसाई यांच्या मालकीच्या असलेल्या गाईवर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गाईचे जाग्यावर निधन झाले.
बाळकृष्ण देसाई हे नेहमीप्रमाणे आपल्या गाईला चरण्यासाठी घेऊन गेले होते. तिथे त्यांनी त्या गाईला बांधले आणि काही कामानिमित्त घरी आले. दुपारी परत ते गाय असलेल्या ठिकाणी गेले असता तिथे त्यांना ती गाय दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. तेव्हा त्यांना गाय मृतावस्थेत आढळून आली.
सहिवाल जातीची ही गाय होते.या गाईची अंदाजे किंमत ६० ते ७० हजार रुपये आहे. अचानक झाल्याने आघाताने देसाई कुटुंब यांना हादरा बसला आहे. आर्थिक नुकसान झालेच मात्र पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सरकार कडून आर्थिक मदतीशिवाय वन्यप्राण्यांसापासून पाळीव प्राण्यांचे संरक्षण केले जावे अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.

error: Content is protected !!