एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने मळगाव रेडकरवाडी येथे वनराई बंधारा बांधला. रेडकरवाडीतील ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हा बंधारा बांधण्यात आला. यासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांचेही विशेष सहकार्य लाभले.

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे सद्यस्थितीत मळगाव गावात पाण्याची पातळी कमालीची खाली जात आहे. या पार्श्वभूमीवर मळगाव रेडकरवाडी येथील झरीच्या वरच्या भागात सिमेंटच्या पिशव्यांच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यासाठी महिलांनी विशेष पुढाकार घेतला. रेडकरवाडीतील ग्रामस्थांनी देखील त्यांच्या या कार्याला बळ देत बंधारा पूर्ण केला. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण झाल्यामुळे निचरा होऊन या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे.

error: Content is protected !!