इंग्लिश मिडियम स्कूल, तळवडे येथील विद्यार्थी *कु. तेजन तुकाराम परब* आणि *कु. पियुष संजय परब* यांनी पुणे येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघात सहभाग घेत शाळेचे नाव उंचावले.

या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कु. तेजन तुकाराम परब याची *सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील जिल्हा संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज* म्हणून निवड झाली आहे.

तेजन हा लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये हुशार असून त्याच्या या निवडीमुळे शाळेचे नाव जिल्हा पातळीवर झळकले आहे.

त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक वर्गाकडून त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!