सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी परब यांनी सांगितले की आजच्या सोशल मिडिया व मालिका, बेबसिरीजच्या जमान्यात ही नाट्यचळवळ जिवंत ठेवली हे अतिशय कौतुकास्पद आहे. परंतु अशा प्रकारचे नाट्यमहोत्सव भव्यदिव्य व यशस्वी होण्यासाठी योग्य मार्केटींग ची आवश्यकता आहे. यापुढे आपण स्वतः तुमच्यासोबत आहे त्यामुळे पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करून स्व. दिनकर धारणकर सराची नाट्यक्रांती घराघरात पोचवूया, व हीच खरी स्व. दिनकर धारणकर सरांना खरी आदरांजली ठरेल. यापुढील दरवर्षी नाट्यमहोत्सवात माझे सक्रिय सहकार्य राहील असे आश्वासन देखील भाजपा युवानेते विशालजी परब यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, स्व. धारणकर सरांचे सुपुत्र हर्षवर्धन धारणकर, चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मण नाईक, पत्रकार ॲड. संतोष सावंत, नगरसेवक तथा रोटरी क्लब अध्यक्ष ॲड सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. निलम नाईक, सौ. सुनिता पेडणेकर, पत्रकार विनायक गांवस, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, सत्यजीत धारणकर, गुरु चिटणीस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!