आयुष मंत्रालय आयुर्वेद संस्था गोवा या हॉस्पिटलची सावंतवाडी येथे ओ. पी. डी सुरु करणेबाबत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज आयुर्वेद संस्था धारगळ गोवा येथे बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटल ची ओपीडी सावंतवाडी लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल सुपरिडंट श्री डॉक्टर विठ्ठल उद्धार, डॉक्टर विनायक चकोर, डॉक्टर राजेश उकरे,परीक्षित मांजरेकर,अर्चित पोकळे,अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान चे पंचकर्म थेरपीस्ट गौरव आनंद कुडाळकर आदि पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!