राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे इन्सुली खामदेव नाका या ठिकाणी सुरू असणारे काम त्या ठिकाणी फलक न लावणे या संदर्भात उपविभागीय अधिकारी महसूल तथा दंडाधिकारी यांना राष्ट्रीय महामार्ग संदर्भात बैठक लावण्याकरता २३ डिसेंबर २०२५ रोजी मी लेखी पत्र दिले होते व त्या निवेदनात राष्ट्रीय महामार्ग एन एस ६६ महामार्गावर झाराप झिरो पॉईंट ते बांदा या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात याबाबत संबंधित अधिकारी यांना तात्काळ आपल्या स्तरावर सूचना देण्यात यावा व त्यांची बैठक लावण्या द्यावी असे पत्र मी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना दिले होते कारण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत इन्सुली खामदेव नाका येथे वारंवार अपघात होतात दिशादर्शक फलक, रबलींगपट्टे, रस्त्यावर पाणी न मारणे धुळीचे साम्राज्य असे अनेक प्रकार संबंधित ठेकेदार कडून होत नाही. निष्काळजीपणे काम करत आहेत या ठिकाणी कोणीही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष देत नाही इन्सुली खामदेव नाका येथे बायपास बोगद्याचे काम सुरू असून त्या बोगद्यातून वाहतूक करताना समोरून येणाऱ्या गाड्या दिसत नसल्यामुळे अपघात होतात शेर्ले,कास, निगुडे, रोनापाल,मडुरा आदी गावात जाणाऱ्या गाड्यांना या बोगद्यातून बायपास करावा लागते त्या ठिकाणी एसटी त्या बोगद्यातून बाहेर पडताना पण त्रास होत आहेत याबाबत राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता सावंतवाडी यांना वारंवार सांगितले जाते परंतु त्यांच्या या दुर्लक्षामुळेच दिनांक हल्लीच इन्सुली येथे झालेल्या अपघातात एका चार वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला त्या ठिकाणी जर रिप्लेटिंग किंवा काहीतरी सेफ्टी साठी त्या ठिकाणी उभारले गेले असता गाडीखाली गेली नसती मागेही २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इन्सुली बोगद्याच्या समोर स्पीडबेकर चा अंदाज न आल्यामुळे साईड पट्टीच्या गटाराला एक महिला जोरात आढळली असे अपघात टाळण्यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसहित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी आमची प्रमुख मागणी आहे कारण कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना सावंतवाडी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी लेखी पत्र पाठवून देखील त्याला केराची टोपली दाखवली त्यामुळे अशाच घटना घडत राहिल्या तर सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होणार आहे त्यामुळे याची योग्य ती दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत असे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!