आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वतः महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ.मानसी परब यांनी केले.

यावेळी हिंदुस्तान पाॅलीमार कंपनीचे पार्टनर टी के मुदालीअर, जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी महिला जिल्हाध्यक्षा सौ.मानसी परब उपाध्यक्ष आनंद खांडेकर सरचिटणीस आर के सावंत,सदस्य रेवती वालावलकर,सदस्य श्रीमती वेंगुर्लेकर मॅडम, पत्रकार रणजिंत जाधव,आदी उपस्थित होते

याप्रसंगी सन्मानार्थ उत्तर देताना कु.भक्ती मठकर यांनी सांगितले की हा पुरस्कार मला एकटीला मिळाला नसून सर्वांच्या पाठींब्यामुळे तुम्हाला मला मिळाला.

कार्यक्रमास बोलताना सरचिटणीस आर के सावंत म्हणाले महीला दिन हा केवळ एक दिवसा पुरता मर्यादित नसून महीलांच्या हक्क,सन्मान सहशक्तीकरणाचा संदेश देणारा दिवस आहे‌. महीलांचा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग

आणि योगदान महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कांडरकर यांनी केले तर आभार रणजित जाधव यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!