इन्सुली गावठण मधील अंगणवाडी मध्ये गेले आठ महिने लाईट सेवा सुरू नव्हती. अंगणवाडीतील मुलांना आजच्या या अति उष्ण गर्मीत बसवा लागत होत. ही बाब अंगणवाडी कर्मचारी यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांना सांगितल्यानंतर नितीन राऊळ यांचे गावठाण वाडीतील सहकारी वृषाल पोपकर व निळकंठ सावंत यांना सांगून तात्काळ त्या ठिकाणी काय असेल ते करा, यावेळी त्यांनी जाऊन पाहणी केली असता अंगणवाडीतील सोलर पॅनल बंद अवस्थेत होता.लगेच त्यांनी दुरुस्ती करून फॅन व लाईटची व्यवस्था मुलांना आपल्या स्वखर्चातून करून दिली. त्याबद्दल गावठण अंगणवाडीतील पालकांनी, सेविका, मदतनीस यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व त्यांचे सहकारी वृशाल पोपकर, निळकंठ सावंत यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!