कुणकेरी हे कोकणातील सावंतवाडी तालुक्यात वसलेले निसर्ग संपन्न गाव.या गावातील उत्सव हुडा म्हणजे एक पर्वणीच.हा उत्सव म्हणजे माहेरच्या आठवणींचा दरवळ आणि परंपरेचा मान.प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनातील हळवा कोपरा उलगडणारा खास सोहळा.माहेरची ओढ…नात्यांच्या या बंधात, आहे खूप गोड.माहेरवाशिणीच्या भावनांचे सुंदर वर्णन करणार भाव स्पर्शी हृदयात भिडणारे गाणे.
कुणकेरीचा हुडा गं!संदेश कुणकेरकर यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेले गाणं भक्तांच्या भेटीला.. या गाण्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे.संदेश कुणकेरकर यांच्यावर या गाण्याने सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
