ग्रामपंचायत कारिवडे, सिंधुदुर्ग डायोसिजन डेव्हलपमेंट सोसायटी सावंतवाडी आणि कोकण डेव्हलपमेंट सोसायटी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पुरुषांकरिता ‘WELEAD’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १३ मार्च २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला गावच्या सरपंच सौ. आरती अशोक माळकर, उपसरपंच श्री. महेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रतिभा जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. शंकर मेस्त्री, पोलीस पाटील श्री. प्रदीप केळुसकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. भरत बुंदे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

मार्गदर्शन: सौ. श्रेया सावंत यांनी यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

आभार: कार्यक्रमाची सुरुवात आणि आभार प्रदर्शन सौ. रेवती वालवकर यांनी केले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुरुषांचा पुढाकार आणि नेतृत्व क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!