मानसी परब -राणे यांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व समर्पित कार्याची दखल घेऊन आर्ट्स, टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती गोवा आणि श्री नागेश महारुद्र फाउंडेशन गोवा यांच्या वतीने राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद, गोवा २०२६ या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र गोवा प्राईम स्टार अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. सेवाभाव, समर्पण व समाजकल्याण यासाठी दिलेले अमूल्य योगदान यामुळे समाजात प्रेरणा, जागरूकता आणि सकारात्मक परिवर्तन घडत आहे असे विशेष उदगार या संस्थेच्या वतीने काढण्यात आले. हा पुरस्कार रविवार दिनांक २२ मार्च २०२६ कला व संस्कृती संचनालय भवन, सेंट्रल लायब्ररी पाटो सेंटर पणजी बस डेपो मागे, पणजी येथे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय सौर ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, गोवा खासदार सदानंद शेट तानावडे, जेष्ठ साहित्यिक केपे प्रा. उल्हास प्रभू देसाई, जी एच आर डी सी अध्यक्ष तथा आमदार रोडोल्फो एल. फर्नांडीस, जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग प्रमोद कामत, रणरागिणी संस्था अध्यक्ष अहिल्यानगर रोहिणीताई पवार, स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेतील अभिनेते अभय खडपकर, रेवती वालावलकर यांची होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात, संचालक समृद्धी पब्लिकेशन, युवा पुरस्कार विजेते, महाराष्ट्र शासन हे होते तर निमंत्रक म्हणून श्री एकनाथ नार्वेकर अध्यक्ष श्री नागेश महारुद्र फाउंडेशन गोवा यांनी जबाबदारी पार पाडली..
