माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती पदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात पडली आहे. रेडी जिल्हा परिषद मध्ये एक अत्यंत चांगले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मागच्या वेळीचा अनुभव गाठीशी असल्याने पुन्हा एकदा त्या पदाला ते न्याय देतील यात शंका नक्कीच नाही. खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार निलेश राणे, दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निश्चित पूर्ण करेन असा विश्वास प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केला. त्यांच्या झालेल्या या निवडीमुळे सर्व स्थरातून कौतुक करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
