सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटना व सावंतवाडी तालुका क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात झाला. या स्पर्धेने जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते.
स्पर्धेतील सर्वात उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम सामन्याची नाणेफेक भाजपा युवानेते विशाल परब आणि सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगांवकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाळा आकेरकर, बाबा काणेकर,हौशी क्रिकेट संघटनेचे शितल राऊळ, हुसेन मकानदार, राजा राणे, रेगे, शिरोडकर, अनील तानावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
