समाजातील रंजल्या गांजलेल्या लोकांना अध्यात्मिक मार्गाने भक्ती मार्गाची गोडी लावणारे श्री श्री १०८ महंत मठाधीश परमपूज्य सदगुरु श्री गावडे काका महाराज यांचा ६१ वा जन्मदिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.सकाळी महामृत्युंजय पूजन व मंत्रपठनाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर गावडे काका महाराज यांचे औक्षण करण्यात आले.

औक्षण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या निक्षय मित्र योजनेअंतर्गत छयग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सात्विक धान्य वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी गावडे काका यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. गेल्यावर्षी ६० रुग्णांना छय रुग्णांना दत्तक घेतले होते. मात्र काकांनी सुरु केलेल्या या सामाजिक कार्याने अनेक संस्था आणि देवालयांनी मदत केल्याने जास्त भार हा काकांच्या भक्त सेवा न्यास या संस्थेवर येऊ दिला नाही. मात्र यावर्षी स्वतः काकांनी १६ पीडित छय ग्रस्थांना दत्तक घेत त्यांच्या सकस, सात्विक आहाराची जबाबदारी घेतली.

माड्याची वाडी पासून हा अध्यात्मिक प्रवास आज सिंधुदुर्ग, बेळगाव, मुंबई, गोवा यांसारख्या मोठ्या शहरातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या सेवाकेंद्रांमध्ये पसरला. यावेळी या सेवा केंद्राच्या वतीने काकांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नवीन कार्यकारणी देखील जाहीर करून त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. उपस्थित अनेक मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यानंतर गावडे काका महाराज यांनी आपल्या अमृतमय वाणीने उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले.

अध्यात्म जगताना आपला गैरफायदा तर घेतला जात नाही ना याचा विचार करूनच अध्यात्मिकतेचि कास धरा असा सल्ला यावेळी काकांनी दिला. माणसाचा देह मिळाला या सारखे पुण्य नाही मात्र तो देह समाजासाठी झीजवावा यातच मानव देहाचे सार्थक आहे. ६१ व्या वयात पदार्पण करताना गेली ६० वर्षे मी केवळ न केवळ रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी जीवन वाहिले. आध्यत्मिक मार्गाने लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हा देह शेवटपर्यंत समाजाच्या कल्याणासाठी झीजवणार असे बोल यावेळी त्यांनी काढले. चंदन ज्याप्रमाणे स्वतः झिजून दुसऱ्यांना सुवास देतो तसेच हे आपले जीवन दुसऱ्यांच्या उद्धरासाठी झीजवा असा मौलिक संदेश त्यांनी दिला. योग शिक्षक, गुरुकुल शिक्षण पद्धत, यासारखे अनेक उपक्रम पुढील काळात आपण राबविणार असल्याचे काकांनी यावेळी सांगितले. यासाठी हे केवळ माझ्या एकट्याचे कार्य नाही तर तुम्हा सर्वांचे देखील आहे. या कार्यात हस्ते परहस्ते आपला सहभाग नोंदवा आणि जीवनाचे कल्याण करून घ्या असा सल्ला यावेळी गावडे काका महाराज यांनी दिला.

यानंतर उपस्थित सर्व भक्तांना दर्शन सोहळा व काकांना त्यांच्या जन्मदिनाचे शुभेच्छा देतानाचे भाग्य लाभले. यांनतर दुपारी अखंड महाप्रसाद,सायंकाळी श्री सरस्वती स्वर्गीणी घुमट आरती मंडळ वेरे बार्देस यांचा घुमट आरतीचा कार्यक्रम पार पडला. रात्री महापुरुष भजन मंडळ माड्याचीवाडी मधलीवाडी बुवा श्री.हृषीकेश गावडे यांच्या श्रुसाव्य भजनाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी सिद्धेश किनळेकर, सुजय गावडे, एकनाथ गावडे, भास्कर गावडे, प्रीती कुशे, केसर वानिवडेकर, चित्रा भिसे, बापू गावकर, राकेश केसरकर आदि पदाधिकारी आणि भक्तगणं मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!