इन्सुली सावंतटेंब शाळा नं. १० या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन पंचायत समिती सदस्य श्री .सदाशिव राणे यांनी केले होते. या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी, काचबिंदू तपासणी, पापणीच्या आजार, दुखापती, मुतखडा, लहान मुलांचे, स्त्रियांचे आजार, किडनी आजार, ब्लडप्रेशर, हृदयरोग इसीजी तपासणी करण्यात आली .यावेळी या शिबिराचा इन्सुली येथील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. संजय केसरे व डॉ. जयश्री केसरे यांनी बाह्य रुग्णांची तपासणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री सदाशिव राणे यांनी आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे कारण कमी वयात मुलांना हृदयविकार, किडनी सारखे गंभीर आजार होत आहेत या आजारावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आपले आरोग्य निरोगी कसे राहता येईल यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे असे मार्गदर्शन केले.तसेच उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी असे आवाहनही केले. यावेळी व्यासपीठावर अल्पिता कोटणीस, सतीश मोरजकर ,नेत्रा राणे, सुंदर आरोसकर, सचिन नेवगी,लता सावंत,प्रणव राणे, सचिन देसाई, आशिष मोरजकर,नेहा देसाई आदी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!