खासदार नारायणराव राणे यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल तर्फे माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमास, विविध जीवनावश्यक वस्तु ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी व सचिव संदीप साळस्कर यांचे हस्ते प्रदान करण्यात आल्या. यामध्ये नेब्युलायझर, हॉट प्लेट, कपडे, रजया, भांडी, इत्यादी साहित्याचा समावेश आहे.

१९९९ मधे ट्रस्टची नोंदणी झाल्यापासुन गेली २८ वर्ष ट्रस्टच्या माध्यमातुन, विविध प्रकारचे उपक्रम जिल्ह्यामधे राबविले जात आहेत. वैद्यकिय शिबिरे, शेतकरी मेळावे, बचतगट मेळवे, बेरोजगाराना स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन आर्थिकदृष्ट्या सबल बनविण्याकरिता, तज्ञांची मार्गदर्शन शिबिरे, रुग्णालयाना औषधे पुरविणे, आदिवासि शाळाना वस्तुरुपी मदत करणे, गरजु रुग्णाना आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता मदत करणे, असे विविध उपक्रम ट्रस्टतर्फे राबविले जात आहेत. यावेळी सेवाश्रमात असलेल्या सर्व वृद्धाना खाऊ वाटप करण्यात आले.

जिव्हाळा सेवाश्रमात झालेल्या या उपक्रमास स्वतः ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, ट्रस्टचे सचिव संदीप साळस्कर, सेवाश्रमाचे संस्थापक बिर्जे सर, सेवाश्रमाचे संचालक संतोष सांगळे, मुंबईवरून खास या उपक्रमास उपस्थित राहिलेल्या मानसी पाटील, महेंद्र पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी बिर्जे यानी ट्रस्टचे आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!