कोलगाव वेंगुर्ला – बेळगाव रस्त्यावर कलावती आई मंदिर नजीक हा तिहेरी अपघात झाला.

आंबेगाव – सावंतवाडी एम. एच. २० बी. एल. १२५६ ही बस सावंतवाडी बस स्थानकाकडे जात असताना, त्याचप्रमाणे एम. एच. १२ के. पी. १४०३ हा डंपर माडखोल येथे जात असताना, चिरा दगडाने भरलेली ओव्हरलोड एल. पी. गाडी के. ए. ४७, ७७०२ ही अंदाजे ७०० चिरा दगड बेळगावच्या दिशेने घेऊन जात होती.

ही गाडी ओव्हरलोड होती.ओव्हरलोड असल्याने ही गाडी चालक आवरू शकला नाही त्यामुळे प्रथमतः आंबेगाव – सावंतवाडी बसला आणि माडखोल येथे जात असलेल्या डंपर ला या गाडीची धडक बसली. यामुळे बस च्या दर्शनी भागाचे आणि डंपर गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच कोलगाव बिट हवालदार मनोज राऊत, सुरेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या मार्गांवरून रोज या एल. पी. गाड्या मोठ्या प्रमाणात जात असतात. विशेष म्हणजे या गाड्या ओव्हरलोड असतात. असे असूनही यावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही असा आरोप होत आहे. यावर लवकरात तोडगा काढून होणाऱ्या अपघातांना आळा बसावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!