कुडाळ तालुक्यातील शिवापुर श्री भैरव देवाच्या पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मंगलमय क्षण आपल्या सर्वांच्या सहकार्याने साकार होत आहे.गावच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि भक्ती भावाचा उत्सव ८,९ व १० रोजी होणार आहे.या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे यांना कणकवली ‘ओम गणेश’ निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य तथा शिवापूर गावचे ग्रामस्थ मोहन सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्प्या तवटे, ग्रामस्थ.श्री गुंजाळ आदी उपस्थित होते..
