गुणवत्ता आणि सातत्य याचा उत्तम मेळ साधला की कोणतेही यश हे दूर नसतं. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं ते म्हणजे राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी याने. आज लागलेल्या १२ विच्या निकालाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि पालकांचा या हायस्कुल प्रति असलेला विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला.

हायस्कुलचा निकाल ९५. ४६% लागला. एकूण ६८३ विद्यार्थ्यांपैकी ६५२ विद्यार्थी पास झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे संचालक मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. अगदी या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी ज्या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्षमताना वाव मिळावा यासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांचं आज सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.

या संचालक मंडळामध्ये मा. श्री.विक्रांत विकास सावंत अध्यक्ष, डॉ. दिनेश नागवेकर उपाध्यक्ष, श्री.व्ही. बी. नाईक सचिव,श्री.सी. एल. नाईक खजिनदार,श्री.अमोल द. सावंत शाळा समिती अध्यक्ष, श्री.चंद्रकांत सावंत सदस्य,श्री.संदिप राणे सदस्य,श्री.सतीशचंद्र बागवे सदस्य, सौ. वसुधा मुळीक सदस्या,सौ.छाया नितीन सावंत सदस्या, सौ. स्नेहा कृष्णा परब सदस्या, संप्रवी कशाळीकर मुख्याध्यापिका, सौ. सुमेधा नाईक उपप्राचार्य, श्री नामदेव मुठे पर्यवेक्षक या सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!