सावंतवाडी तालुक्यातील एक दर्जेदार शैक्षणिक हायस्कुल आणि कॉलेज म्हणून राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ची ख्याती आहे. अनेक तज्ञ् शिक्षक मुलांचं भवि्तव्य घडवत असतात. हीच परंपरा कायम राखत यावर्षी देखील राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज चा निकाल हा ९९. २०% एवढा लागला.
एस. एस. सी. बोडर्च्या परीक्षेला एकूण १२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे या संस्थेचे अध्यक्ष मा. विक्रांत विकास सावंत, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या..
