गेली ११ वर्षे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल देण्याची किमया यावर्षी देखील केलीय ती म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील एक अग्रगण्य इंग्लिश स्कुल शांतीनिकेतन यांनी.नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान चे इंग्लिश स्कुल हे १२ वर्षे सातत्य राखण्यात यशस्वी ठरले आहे. एखाद्या इंग्लिश स्कुल ने सतत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल देणे ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.

७३ टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. २१ टक्के विद्यार्थी हे ग्रेड A ने तर ६ टक्के विद्यार्थी हे ग्रेड B ने पास झाले.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे चेअरमन विक्रांत विकास सावंत, सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक समीर परब, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!