गेली अनेक वर्षे सामाजिक, गरीब उपेक्षित लोकांसाठी झटणाऱ्या आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानसी परब – राणे यांना महाराष्ट्र युवा आयकॉन स्टार अवॉर्ड ने सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी, पदमश्री,जेष्ठ समाजसेवक विजयकुमार शाह अभिनेत्री राजश्री कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी १६ मे २०२६ रोजी,सौ.वेणूताई चव्हाण स्मारक नाट्य सभागृह, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, कराड-सातारा येथे गौरविण्यात आले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजधानी सेवा प्रतिष्ठान कराड, अनुश्री फाउंडेशन, कराड, संत शिरोमणी तुकाराम महाराज शिक्षण संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे, बचतगत यांना हा पुरस्कार दिला जातोय. सौ. मानसी परब -राणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या सन्मानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!