अलीकडे गावांची स्वच्छता हा अतिशय गंभीर विषय बनत चाललाय. गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. शासन स्थरावर देखील विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. मात्र यात म्हणावे तेवढे यश मिळत नाही.

अश्यातच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावामधील एक बॅनर विशेष लक्ष वेधून घेत आहे. या बॅनर मधील मजकूर खूपच मनाला भिडणारा आहे. जो माणूस एका आईचा आणि एका बापाचा असेल, तो आपल्या गावातील रस्त्यावर कचरा टाकणार नाही. साहजिकच हा मजकूर वाचून आतातरी लोक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत अशी अपेक्षा करूया. मात्र अश्या पद्धतीच्या बॅनर ने नक्कीच सगळ्याच नागरिकांना कचऱ्याच्या बाबतीत किती जागरूक राहून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे याचा संदेश पोचला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!