दहावी – बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला- मुलींचा सकल मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बँकेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळशेजारी खासकीलवाडा येथे हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ, मालवण मतदार संघांचे लोकप्रिय आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती प्रवीण भोसले – माजी राज्यमंत्री, मनिष दळवी- जिल्हा बँक अध्यक्ष, संजू परब – शिवसेना जिल्हा प्रमुख, युवराज लखमराजे भोसले, सौ. श्रद्धाराजे भोसले- विद्यमान नगराध्यक्षा सावंतवाडी, नगरपरिषद, विक्रांत सावंत- विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, संदिप कुडतरकर यांची लाभणार आहे.

या सत्कार सोहळ्याला जास्तीत जास्त यशस्वी मुला मुलींनी तसेच पालकांनी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज सिंधुदुर्ग याचे अध्यक्ष सीताराम गावडे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!