वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष श्री. एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या राहत्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांनी तत्काळ भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि साळगांवकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला.

यावेळी श्री. परब यांनी कुटुंबीयांची विचारपूस करत, अशा कठीण प्रसंगी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.

या प्रसंगी आरवलीचे सरपंच श्री. समीर कांबळी, उपसरपंच श्री. किरण पालयेकर, सागरतीर्थचे सरपंच श्री. एकनाथ कुडव, आरवलीचे माजी सरपंच श्री. तातोबा कुडव, शिरोड्याचे माजी सरपंच श्री. मनोज उगवेकर तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. लक्ष्मीकांत कर्पे, श्री. शेखर गोडकर, श्री. महादेव नाईक, श्री. मिलिंद साळगांवकर आणि श्री. तुषार रगजी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वेळोवेळी मदत करण्याची भूमिका भाजपा युवा नेते श्री. विशाल परब सातत्याने निभावत असून, त्यांच्या या मदतीमुळे साळगांवकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!