विधान सभेत दशावतार कलाकारांच्या मागण्यांचा आवाज उठविल्याबद्दल पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर यांच्या हस्ते आमदार निलेश जी राणे यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच नेहमी दशावतार कलाकारांच्या हाकेला हात देऊन साथ देणारे सन्माननीय दत्ताजी सामंत यांचाही मोलाचा वाटा आहे म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आमदार निलेश राणे यांनी सांस्कृतिक मंत्री महोदयांना लवकरच कोकणात दशावतारांच्या भव्य दिव्य कार्यक्रमाला निमंत्रित करून भव्य सत्कार करण्याचे सांगण्यात आले. तसेच घेतलेलं कार्य १०० टक्के पूर्ण करण्याचे वचन आमदार निलेश राणे यावेळी दिले.या सोहळ्यास दत्ता सामंत, बाबा परब आणि दशावतार कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!