तुम्ही जर मूळचे ख्रिश्चन असता तर तुम्हाला हिंदू धर्मात घ्यायचा प्रश्नच नव्हता. मात्र तुम्ही हिंदू धर्मात जन्मला आणि काही अपरिहार्य कारणामुळे धर्म परिवर्तन केलेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी मिळेल. मात्र तुम्ही पुन्हा धर्म सोडण्याचा मार्ग अवलंबू नका. तुमचे जे काही प्रश्न भक्ती मार्गातून सोडवायचे असतील ते हिंदूधर्म गुरु या नात्याने तुमच्या भक्तीच्या जोरावर नक्कीच सोडवेन. तुम्ही मला भक्ती द्या मी तुम्हाला नक्कीच स्थैर्य देईन अशी साद घालत आज ओल्ड गोवा येथे श्री गोवेश्वर मंदिर येथे ११५ कुटुंबियांना पुन्हा हिंदू धर्मात हिंदू धर्मगुरू जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंदचार्यजी यांनी प्रवेश दिला. विधिवत आणि शाश्त्रशुद्ध पद्धतीने हा प्रवेश देण्यात आला.

यापुढे कोणतेही संकट असुदे धर्मगुरू म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. दर तीन महिन्यांनी माझे गोवा उप पिठावर आगमन होत असत. त्यामुळे मी कुठेही तुम्हाला सोडून जाणार नाही. तुमचे सर्व पूर्वज हे हिंदू होते. ते हिंदू म्हणूनच इहलोकीची यात्रा संपवून परलोकी गेले. आपण सुद्धा आता हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करत आहात त्यामुळे यापुढे जे काही सोपस्कार असतील ते हिंदू धर्मा प्रमाणे करावेत असेही यावेळी जगदगुरु नरेंदचार्यजी यांनी घरवापसी वेळी उपस्थित सर्व भाविकांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!