आषाढी महा एकादशी निमित्त होणारी पूजा सकाळी ६ वाजता काकड आरती आणि महापुजेने होणार असून त्याचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर असणार आहेत. यानंतर सकाळी ११:३० ते २ वाजेपर्यंत श्री सदगुरु संगीत विद्यालय यांचा गायनाचा कार्यक्रम, २ ते ३ कालिका देवी भजनी मंडळ कारिवडे यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी ३ ते ४ महिला मंडळ सावंतवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ४ ते ६ पंडित योगेश बोरचाटे माणगाव यांचा श्रुशाव्य संगीत गायनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे कुरोली सिद्धेश्वर, सातारा यांचे कीर्तन होणार असून रात्री ९ नंतर श्रींचा पालखी सोहळा होणार आहे.
रविवारी सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे ( कुरोली सिद्धेश्वर, सातारा ) यांचे कीर्तन, ९ नंतर श्रींची पालखी सेवा, सोमवार सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे ( कुरोली सिद्धेश्वर, सातारा ) यांचे कीर्तन, मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. सौ. सिद्धी मेस्त्री ( ओटवणे ) यांचे कीर्तन, बुधवारी सायंकाळी ६ ते ८ कीर्तनकार कीर्तनभूषण ह. भ. प. श्री हृदयनाथ गावडे ( साळगाव ) यांचे कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.