राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने बुधवारी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:१५ वाजता कॉलेजच्या सभागृहात उच्च माध्यमिक विभागातील निवृत्त शिक्षकांना प्रशालेत आमंत्रित करून त्यांचा उचित सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, प्रशाला प्रेमी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राणी पार्वती देवी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे..