काही दिवसांपूर्वी कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या औषध साठा, अपुरा कर्मचारी वर्ग यावर शिवसेना उपतालुका प्रमुख राकेश पवार आणि कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे लक्ष वेधले होते. यावेळी प्रितेश राऊळ यांनी आपण स्वतः येऊन यावर तोडगा काढू असं सांगितले होते.

आज आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी अपुरा कर्मचारी, अपूर्ण औषध साठा याबद्दल विचारले असता प्रितेश राऊळ यांनी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कुणकेरी येथील अधिकाऱ्यांना येथील अतिरिक्त भार देण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांची कोणतेही हेळसांड होऊ नये, गर्भवती महिला असोत, अथवा वृद्ध असोत त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नक्कीच आम्ही कटिबद्ध आहोत असेही यावेळी प्रितेश राऊळ म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळी आजारांबद्दल योग्य ती खबरदारी घ्या आणि नागरिकांना उत्तम आरोगू द्या असेही प्रितेश राऊळ बोलले.

यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश पवार, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, सुशांत ठाकूर, अभि टिळवे, मुकेश ठाकूर, राजेंद्र निर्गुण, डॉ. कर्तस्कर, डॉ. पटवर्धन, मंगेश परब, सी. ए. नाईक, रश्मी सावंत, जीवन सैराळे आदि उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!