सावंतवाडी आगारातून सकाळी ०८:३० वाजता सुटणारी सावंतवाडी- शिरोडा एसटी बस शिरोडा येथून ०९:३० वाजता नाणोस मार्गे शिरोडा-सावंतवाडी अशी फेरी सुरू होती . तसेच दुपारी १२:३० वाजता सुटणारी शिरोडा-सावंतवाडी, नाणोस,गुळदुवे, आरोंदा खरी मळेवाड मार्गे सावंतवाडी सुरू होती.तसेच शिरोडा -नाणोस ही संध्याकाळी ०५:३० वाजता नाणोस अशी फेरी सुरू होती.

मात्र नाणोस-शेटयेवाडी येथील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे सदरील बस सेवा बंद करण्यात आली होती. आता नाणोस शेटयेवाडी येथील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली झाडी साफ करण्यात आली आहे. ही बस सुरु झाल्यास शिरोडा येथे शाळेत जाणारे विद्यार्थी विक्रेते व प्रवासी यांना ही बस सेवा सोयीची ठरणार आहे.

तरी ही बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी असे निवेदन आज जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा सोनू कवठणकर यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांना दिले.

One thought on “नाणोस गावात एस. टी. बस सेवा तात्काळ सुरु करा – सुदन कवठणकर..”
  1. Playing live dealer games used to feel complicated but this site makes everything so simple. The stream quality is crystal clear and the dealers are super friendly. I come back every weekend for the live sessions. You really need to see this tenx365live

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!