महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी फार्मर आयडीची अट शिथिल करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, ऑनलाईन प्रणालीद्वारे कृषिमंत्री दत्ताजी भरणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, विद्यमान आमदार निलेश राणे, यांच्यासह महसूल व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी वर्ग, तसेच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते..